Why companies cannot capitalize on innovative ideas?

Leave a comment

Most people by now know that the origin of the Graphic User Interface that Apple enriched was Xerox PARC and not apple itself.   Graphic User Interface or GUI has been revolutionary in computers.  Absence GUI we still would be typing silly commands with < and > signs etc.  Though Xerox PARC invented GUI it is worth noticing that they did not know not only how effectively to use it but also what lies in future with the help of GUI.  Why? It was Apple and later on Microsoft that took GUI to the next level whereby every elementary school kid now uses GUI without even knowing it!

“You’ve Got Mail!” How many 7-8 year old kids today know about this expression? I myself came to know about this expression because I watched a movie by the same name.  But ask folks older than me say those in North America who started using dial-up network and computers in early 1990’s.  It was a message from AOL whenever you would receive an email.  In early 1990’s (by my understanding) AOL was the Facebook of that time.  Your news, email, chat even the internet connection was AOL.  AOL was a web world at that time.  Now ask 7-8 year old about Facebook. She/he probably not only has an account but cannot live with it. If you ask the same 7-8 year old about AOL “What’s that?” would be a typical reply.  At one time in recent history AOL was the Facebook but it could not capitalize on the early innovative advantage that it had in a changing web and digital world. Why?

Many of you might remember that we used to use MSN Messenger or Yahoo Messenger.  Remember those good old days?  These messengers had everything that we needed at that time and most of the things that Facebook offers today.  What they lacked was sharing of information or your life with your friends.  These messengers enriched our social media life but could not capitalize on early innovative advantage.  Why?

How many people use Tablets these days? A bunch! Who dominates the tablet market? Apple! Who introduced Tablet PC to the world? Not Steve Jobs! No!! In Jobs’ words “unimaginative” Bill Gates introduced Tablet PC in 2002.  Apple introduced iPad in 2010.  Eight years after Microsoft introduced the tablet.  During the introduction of Tablet PC Bill Gates said this, “By the end of a decade we’ll look back and say, ‘Was there ever a time where computing didn’t involve having these types of applications and this kind of accessibility to information’.”  Boy oh Boy was he not right!  In fact when Steve Jobs heard flattering words about Microsoft’s Tablet PC he took that as a challenge and determined to show the world how a real Tablet should look like!

Where is Microsoft today in Tablet PC? Nowhere!  Why the company that introduced Tablet PC could not capitalize on early innovative advantage?

In all these examples the theme is same.  Many companies introduce revolutionary ideas but do not capitalize on these revolutionary ideas in distant or long future.  Why these companies miss the advantage they have?

योग सूत्रे विवरण

2 Comments

भूमिका

प्रेरणा व या लिखाणाचे स्वरूप

पतंजलि महामुनींचा पातंजल योगदर्शन हा ग्रंथ सर्वसाधारण लोकांना योगसूत्रे या नावाने माहित आहे. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा पाया वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, योगसुत्रे, भक्तीसूत्रे आणि पुराणे यांवर आधारित आहे. योगासुत्रांचा अभ्यास करावा ही माझी मनापासूनची इच्छा होती आणि आहे. या ग्रंथाचा अभ्यास करण्यामागील पहिली प्रेरणा म्हणजे, माझी स्वत:ची साधना होय. पातंजल योगदर्शन हे भारतीय तत्वज्ञानाचे एक महत्वाचे अंग आहे. हे अंग प्रत्यक्ष कृती करण्याचे अंग आहे, तात्विक चर्चा करण्याचे अंग नाही. प्रत्यक्ष साधना केली नाही तर योगसुत्रे समजणे, त्यांचा अनुभव येणे केवळ अशक्य!

प. पू. स्वामी माधवनाथांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला अनुग्रह देऊन, साधन सांगून माझ्यावर अनंत उपकार केले की ज्याला मी पात्रही नाही. पू. स्वामी माधवनाथ हे पावसनिवासी पू. स्वामी स्वरूपानंद यांचे उत्तराधिकारी. सोहं ध्यानसाधना ह्या नाथसंप्रदायाच्या सांप्रदायिक साधनेचा उपदेश पू. स्वामी माधवनाथांनी मला 1993 साली केला.  पू. स्वामीजींच्या प्रकृतीच्या मर्यादेमुळे मी माझ्या साधनेतल्या अडचणी पू. स्वामीजींचे अधिकारी शिष्य पू. स्वामी मकरंदनाथ (पूर्वाश्रमींचे श्री. मकरंद वझे) यांना विचारीत असे. पू. स्वामी माधवनाथांच्या महानिर्वाणानंतर पू. स्वामी मकरंदनाथ यांना मी सद्गुरूस्थानी मानून साधना करीत आहे.

मी जेव्हा योगासुत्रांचा अभ्यास करायचे ठरवले तेव्हा मी अप्पा बळवंत चौकातून “भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन” हा आदरणीय कृष्णाजी केशव कोल्हटकरांचा ग्रंथ विकत घेतला. एका अर्थांनी मी नशीबवान ठरलो. काहीही माहीत नसताना मी एक यथार्थ ग्रंथ विकत घेतला. हा ग्रंथच या लिखाणाचा स्त्रोत आहे. किंबहुना हे लिखाण म्हणजे या ग्रंथाचा अभ्यास आहे असे म्हटले तरी चालेल. आ. कोल्हटकरांनी जी साधना केली तशी आजच्या जमान्यात कोणी करेल असे वाटत नाही. या लेखनामुळे मला स्वत:ला अशी साधना करावी ही प्रेरणा व्हावी व जे याचे वाचन करतील त्यांना देखील अशी प्रेरणा व्हावी व त्यांनी देखील या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करावा ही देखील एक प्रेरणा आहे.

दुसरी प्रेरणा म्हणजे प्राचीन भारतीय ग्रंथांचा अभ्यास आपण करावा ही होय. ह्या प्रेरणेचे प्रणेते पू. स्वामी वरदानंदभारती, अर्थात स्व. अनंतराव आठवले. वास्तविक माझा स्वभाव हा पाश्चिमात्य विचारधारणेचा आहे. परंतु प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान आपल्या अनुभवावर घासून घ्यावे हा पू. अनंतरावांचा विचार अतिशय प्रेरणादायी आहे.

पू. कोल्हटकरांचा ग्रंथ हा 1951 साली प्रसिद्ध झाला. 1951 सालची मराठी आणि आताची इंग्रजाळलेली मराठी यात जमीन आस्मानाचा फरक आहे. काही शब्द जे आपण स्त्रीलिंगी वापरतो ते त्याकाळी पुल्लिंगी होते असे मला जाणवले. अनेक लोकांना कोल्हटकरांचा ग्रंथ वाचणे आणि समजून घेणे हे अतिशय अवघड वाटेल असे मला स्वत:ला वाटते. आपल्यावरून जग ओळखावे या न्यायाने. कोल्हटकरांचा ग्रंथ सोप्या भाषेत मांडावा हे ह्या लिखाणाचे एक स्वरूप आहे.

आ. कोल्हटकरांनी या ग्रंथाचे नाव भारतीय मानसशास्त्र असे ठेवले. मी स्वत: काही मानसिक समस्यांमधून गेलो आहे आणि जात असतो. अशावेळी पाश्चिमात्य मानसशास्त्र काय सांगते याचा काही बाही अनुभव आहे. परंतु प्राचीन भारतीय मानसशास्त्र आपल्याला काय शिकवते या अंगाने योगासुत्रांचा अभ्यास करता येईल का? याचा आपण विचार करावा आणि ते आपल्या अभ्यासाचे अंग असावे असेही या लिखाणाचे स्वरूप आहे.

सरते शेवटी मी अजून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. माझे लेखन आ. कोल्हटकरांच्या लेखनाशी अनेक ठिकाणी मिळते जुळते असू शकेल. हे वाङ्मयचौर्य मी मानीत नाही कारण मी जणू काही त्यांच्या लेखनाचे साध्या मराठीत भाषांतर करीत आहे असाही या लेखनाचा प्रकार आहे. ज्या लोकांना योगासुत्रांचा खोलवर अभ्यास करायचा आहे त्यांनी मूळ ग्रंथाचा अभ्यास करावा. जिथे जिथे मी कोल्हटकरांची वाक्ये उद्धृत करीन तिथे तिथे मी ती अवतरणामधे देईन. हे 100% जमेल असे सांगता येणार नाही कारण मी काही पुस्तक प्रकाशित करीत नाही तर केवळ माझ्या ब्लॉग वर लेख लिहीत आहे. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी व मला माफ करावे.

समाधिपाद सूत्र १

Leave a comment

अथ योगानुशासनम || 1 ||

अन्वय

अथ योग अनु शासनम |

मराठी अर्थ

अशा प्रकारे किंवा आता (अथ), (आपण) योगाचे (योग) आचरण (अनुशासन) करुयात.

विवरण

योग ही करण्याची गोष्ट आहे. गप्पा मारण्याची किंवा चर्चा, वाद विवाद करण्याची गोष्ट नाही. “अथ” अशाप्रकारे म्हणजे, या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपण योगाचा अभ्यास करणार आहोत. कोल्हटकरांच्यामते “अनु” हा शब्द वापरण्यामागे एक विशेष कारण आहे. “कोणत्याही शास्त्राचा प्रारंभ करताना अंनुबाधचतुष्टय सांगण्याचा प्रघात आहे.” (कोल्हटकर.) अंनुबंधचतुष्टय म्हणजे आपण जो अभ्यास करणार आहोत तो अभ्यास चार गोष्टींशी निगडीत असतो.

1)  अधिकारी. या अभ्यासाचा अधिकारी कोण? माझ्यामते या अभ्यासाचा अधिकारी कोणीही मुमुक्षू म्हणजे ज्याला जाणण्याची इच्छा आहे व ज्याच्या मनात अनुताप आहे तो होय. काय जाणण्याची? हे शास्त्र काय आहे? त्याच्या अभ्यासाने प्राप्त काय होणार आहे? त्याचा अभ्यास कसा करावा? इतपत जिज्ञासा ज्याच्या ठिकाणी आहे आणि/किंवा मन शांत कसे होईल? आनंदाची प्राप्ती कशाने होईल अशी तळमळ अथवा इच्छा ज्याच्या मनात निर्माण होईल ती व्यक्ति या आभासची अधिकारी आहे असे मला वाटते.

2)  प्रयोजन. या शास्त्राचे प्रयोजन काय? या शास्त्राचे प्रयोजन “योग” आहे. योग हा शब्द युंज या संस्कृत धातू (क्रियापद) पासून निर्माण झाला आहे ज्याचा अर्थ जोडणे असा आहे. इथे जोडणी कशाची करायची आहे? इथे जीवाची जोडणी त्याच्या मूळ स्वरूपाशी करायची आहे. जीव म्हणजे काय? जीव म्हणजे ज्याला मी “मी” “मी” असे म्हणतो तो. हे “माझे” घर आहे. म्हणजे घरं म्हणजे “मी” नाही. याच न्यायाने माझ्या बुद्धीला हे पटत नाही म्हणजे बुद्धी म्हणजे “मी” नाही. मग “मी” कोण? माझे स्वरूप काय? या प्रश्नाचे उत्तर हे शास्त्र देईल. किंबहुना हेच या शास्त्राचे प्रयोजन आहे.

3)  विषय. या शास्त्राचा/अभ्यासाचा विषय काय? माझ्या मते सर्वात महत्वाचा विषय हा आहे की जीव आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी कसा जाईल हा होय. परंतु त्या अनुषंगाने हे शास्त्र अंत:कारणाचा सर्वार्थाने विचार करते. मन काय? बुध्द्धी काय? मनात कोण कोणत्या प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात? सध्या भाषेत, मनात कोणकोणते विचार निर्माण होतात? त्यांचा निरोध कसा करायाचा? हे सर्व करून प्राप्त काय होणार आहे? हे सर्व विषय या शास्त्रात/अभ्यासात येतात.

4)  संबंध. (शास्त्राचा) अधिकारी, (शास्त्राचे) प्रयोजन, आणि (शास्त्राचा) विषय यांचा एकमेकांशी संबंध काय? (हे माझे मत कोल्हटकरांच्या मतपेक्षा थोडे वेगळे आहे.) शास्त्राचा विषय आणि शास्त्राचे प्रयोजन जो अधिकारी आहे त्या अधिकारी व्यक्तींच्या सर्व प्रश्नांना स्पर्श करून त्या प्रश्नांची व्यापक उकल करते असा संबंध या सर्वांचा एकमेकांशी आहे.

अशाप्रकारे ही भूमिका समजून घेऊन आता (अथ), (आपण) योगाचे (योग) आचरण (अनुशासन) करुयात.

सद्गुरूचरणार्पणमस्तु ||

Follow

Get every new post delivered to your Inbox.