भूमिका
निवडणूक म्हटले की आपल्या सर्वांना प्रचाराची घाईगर्दी, पोस्टर ची जंत्री, भिंती रंगवणे, आणि प्रचाराच्या सभांची रणधुमाळी असे चित्र डोळ्यांसमोर येते. असेच काहीसे चित्र मी २००४ साली मनात ठेवून माझी पहिली अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अनुभवत होतो. परंतु मनातील चित्र आणि वस्तुस्थितीतला अनुभव यात जमीन आसमानाचा फरक होता. त्याचे कारणही होते ते म्हणजे अमेरिकेत येऊन मला जेमतेम ३ वर्षे होत होती. या तीन वर्षातील दोन वर्षे तर मी एक विद्यार्थी होतो. त्यामुळे केबल चॅनलची वानवा, तुलनेनी अमेरिकन लोकांशी कमी असणारा संबंध आणि माझा अमेरिकन राजकारणचा जुजबी अभ्यास अशा कारणांमुळे हा फरक मी अनुभवला. २००८ सालच्या निवडणुकीपर्यंत मात्र राजकारणाचा अभ्यास वाढला होता. राजकारणाची मूळापासून आवड होती, त्यातून अमेरिकेचे local राजकारण जगावर किती मोठ्या प्रमाणावर परिणाम करते याचा अनुभव इराक युद्धमुळे आला होता. मग स्वाभाविकच अमेरिकेतील पक्ष कोणते, त्यांच्या विचारधारा काय आहेत, या विचारधारांचा जनमानसाशी कसा संबंध आहे, इथले प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा राजकीय पक्ष शोधतात तेव्हा पक्षीय विचारसरणीचा पगडा त्या solutions वर कसा असतो, तसेच इथली राजकीय व्यवस्था कशी आहे, इथले सरकार कसे चालते, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था कशा आहेत इत्यादींचा अभ्यास नकळत सुरू झाला. बघता बघता २०१२ सालच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि अशी कल्पना आली की आपला अभ्यास मायदेशातील लोकांशी share करता आला तर? यातून हा लेखन प्रपंच सुरू झाला.
यात सर्वप्रथम आपण इथले राजकीय पक्ष आणि त्यांच्या भूमिका यांचा थोडक्यात आढावा घेऊ.
राजकीय पक्ष आणि त्यांच्या भूमिका.
अमेरिकेमध्ये प्रामुख्याने केवळ दोन राजकीय पक्ष आहेत. १) डेमोक्रॅटिक पार्टी आणि २) रिपब्लिकन पार्टी. याशिवायही काही पक्ष आहेत परंतु त्यांचे अस्तित्व अगदीच नगण्य आहे. या नगण्य पक्षांमधील एक प्रमुख पक्ष आहे तो म्हणजे लिबर्टेरियन पार्टी. परंतु हा पक्ष एक विचारधारा म्हणून जास्त प्रभावी आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जो संघटनेचा आराखडा (organizational structure) लागतो तो मात्र या पक्षाकडे अजिबात नाही त्यामुळे विचारधारेच्या जवळीकीमुळे या विचारधारेचे लोक सर्वसाधारणपणे रिपब्लिकन पक्षाला मत देतात. याखेरीजहि ग्रीन पार्टी नामक अजून एक माहीत असलेला पक्ष आहे. अमेरिकेत दोनच पक्ष का? या प्रश्नाचे उत्तर अनेक धुरीणाना अजून सापडलेले नाही. आपल्या भारतीय मांनासिकतेतून पहिले तर मात्र एक कारण स्पष्टपणे जाणवते. आपल्याकडे अनेक पक्षांची जी खोगीरभरती आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक मताला पक्षाच्या मतापुढे आपल्या समाजात काहीही स्थान नाही. एखाद्या व्यक्तीचे मत पक्षाच्या मताविरुद्ध असेल तर आपला समाजहि ते मान्य करीत नाही मग स्वाभाविकच मतभेद झाले की पक्ष सोडून जाऊन नवीन पक्ष स्थापन करण्यावाचून पर्याय राहत नाही. मात्र असा प्रकार अमेरिकेत अजिबात नाही. इथे पक्षाची जी मूल विचारसारणी आहे त्या विचारधरणेचेच कार्यकर्ते किंवा नेते असतात. मात्र काही बाबतीत मतभेद झाले तरी आपण आपल्या माठावर टिकून राहायला मुभा असते. कोणी कुणाला काढून टाकण्याचे काही कारणच नाही कारण “दोन व्यक्तींचे सर्वच विचार सारखे असतील असे असूच शकत नाही” इतपत समजण्याएवढी आणि मान्य होण्याएवढी राजकीय प्रगल्भता इथे आहे. शिवाय पक्षाचा उमेदवार म्हणून प्रत्येकाला “primary” च्या दिव्यातून जावे लागतेच. “प्रायमरी”म्हणजे काय हे आपण यथावकाश पाहणारच आहोत. अशा मोकळ्या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे जगात ज्या “डाव्या” आणि “उजव्या” राजकीय विचारसारणी आढळतात त्याच दोन विचारसरणीचे दोन पक्ष इथे दिसतात.
अमेरिकेतील पक्ष समजून घेण्यापूर्वी एक गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे की अमेरिका हे एक मोठे आणि बलाढ्य राष्ट्र असे आज आपल्याला जारी दिसत असले तरी ह्या राष्ट्राच्या जन्माच्यावेळी याचे स्वरूप म्हणजे वसाहतींचा समूह (collection of colonies) असेच होते. या राष्ट्राचे नाव देखील United States of America असेच आहे. या राष्ट्राच्या जन्माच्यावेळी कोणताही राजकीय पक्ष अस्तीत्वात नव्हता. राजकीय पक्षांचे आजचे हे स्वरूप १९७६ सालापासूनच्या राजकीय उत्क्रांतीचे परिणामस्वरूप आहे. जसजसे राष्ट्र आकार घेऊ लागले, राजकीय जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या, विचारधरणेतील मतभेद स्पष्ट होऊ लागले तस तसे राजकीय पक्षांचे स्वरूप मूर्त होऊ लागले. भारतात ज्याप्रमाणे राष्ट्रीय सभेची स्थापना होऊन त्याचे रूपांतर पुढे कोंग्रेस पक्षात झाले त्याच्या विरुद्ध प्रवाह अमेरिकेत आढळतो. इथे प्रथम राज्यकारभार चालू झाला, राजकीय स्वातंत्र्यानंतर राजकीय, वियचारिक मतभेद झाले आणि त्यातून आखीव (organized) पक्षांची निर्मिती झाली.
डेमोक्रटिक पार्टी
आजची डेमोक्रटिक पार्टी आणि १५० वर्षांपूर्वीची डेमोक्रटिक पार्टी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
किंबहुना आजची डेमोक्रॅटिक पार्टी ही काही मुद्यावर पूर्वीच्या रिपब्लिकन पार्टी सारखी दिसते.
थॉमस जेफरसनला डेमोक्रटिक पार्टीचा प्रणेता म्हणून समजले जाते. Alexander Hamilton ह्याची विचारसारणी भरभक्कम केंद्रीय सरकार (strong central government) असावं अशा स्वरूपाची होती. या विचारसरणीला थॉमस जेफरसन, जेम्स मेडिसन या दिग्गजांचा विरोध होता. हे राष्ट्र निरनिराळ्या राज्यांचा समूह आहे आणि त्याच्या या जन्मजात स्वरूपामुळे केंद्रीय सरकार मर्यादित असावे आणि राज्यांकडे जास्त अधिकार असावेत अशी विचारसारणी थॉमस जेफरसन आणि जेम्स मेडिसन या धुरीनांची होती. या धुरीनांच्या समर्थकांना Deomocratic-Republican Party असे संबोधले जायचे. Alexander Hamilton च्या विचारसरणीच्या समर्थकांना Federalist पार्टी म्हणून संबोधले जायचे. मात्र १८१२ च्या ब्रिटीशांबरोबरच्या युद्धानंतर आणि Hamilton च्या मृत्यूनंतर फेडेरलिस्ट पार्टीचा अस्त झाला आणि देशामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी हा एकमेव प्रबळ पक्ष अस्तीत्वात राहिला.
मात्र १८५०-६० च्या सुमारास आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला. गुलामगिरी नैतिक दृष्ट्या योग्य काशी यावर थॉमस जेफरसन सारखा मोठा नेता देखील विचार करी असे. परंतु आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीला एक आर्थिक किनार देखील आहे. दक्षिण अमेरिकेची (दक्षिण अमेरिका हा continent नाही तर अमेरिकेचा दक्षिण भाग) अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून तर उत्तर अमेरिकेची अर्थव्यवस्था व्यापारावर अवलंबून. शेती ही प्रामुख्याने मनुष्यबळावर अवलंबून असल्यामुळे, दक्षिणेकडील श्रीमंत शेतकरी हे आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीविरोधात अजिबात नव्हते कारण फुकटचे मनुष्यबळ त्यांच्या फायद्याचे होते. याउलट उत्तरेकडील लोकांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती कारण गुलामांना आपला मालक सोडून जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध असूनही त्यांना कोणतेच स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांच्या क्रयशक्तीचा उपयोग उत्तर अमेरिकेतील व्यापारी लोकांना होत नव्हता. नैतिक कारण प्रबळ की आर्थिक कारण प्रबळ ठरले यावर मतभेद असू शकतील परंतु सर्वसाधारणपणे अमेरिकेचे नागरी युद्ध नैतिक युद्ध म्हणूनच समजले जाते. गुलामगिरीच्या प्रश्नाला राज्यांचे अधिकार आणि केंद्रीय सरकारचे अधिकार या अंगाची देखील एक झालर आहे. आपण पहिले की डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्ष हा सर्वसाधारणपणे राज्यांच्या अधिकाराच्या बाजूचा होता. परंतु गुलामगिरीचे उच्चाटन हा राज्यांच्या अखत्यारीतला प्रश्न नसून तो संपूर्ण देशाचा प्रश्न आहे अशा मतावर या पक्षाची विभागणी झाली. ज्या लोकांनी गुलामगिरीला विरोध केला त्यांचा समूह रिपब्लिकन पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला तर राज्यांच्या अधिकाराला जास्त महत्व देणारे डेमोक्रट्स म्हणून ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे देशात दोन पक्ष अस्तीत्वात आले. पुढे जागतिक मंदी च्या काळात (depression) अमेरिकेची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलंडुन पडली कारण त्याकाळी कोणतीही central banking system अस्तीत्वात नव्हती. जागतिक मंदीच्या काळात तथाकथित free market नि सामान्य लोकांना काहीच मदत केली नाही. अशावेळी सरकारने सामान्य माणसाला मदत केली पाहिजे. सरकारचा सहभाग अशा अडचंनींच्या काळात सामान्य माणसाला मदत करणारा असा असावा अशा पुरोगामी विचारांचे फ्रॅंकलिन रुझोवेल्ट अमेरिकेला राष्ट्राध्यक्ष म्हणून लाभले. रुझोवेल्ट यांनी अनेक दूरदर्शी, युगप्रवर्तक अशा योजना राबवल्या. त्यातील Social Security ही एक महत्वाची योजना. मात्र अशाप्रकारे केंद्रीय सरकारचा वाढत जाणारा आकार हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, सरकारच्या हातात सर्व सत्ता एकत्रित केली गेली तर ते सरकार पुढे जुलुमी बानु शकते, केंद्रीय सरकारपेक्षा राज्यांना जास्त अधिकार पाहिजेत अशा विचारसरणीचे डेमोक्रट्स मात्र यामुळे दुखावले जाऊन ते रिपब्लिकन पक्षात सहभागी झाले. फ्रॅंकलिन रुझोवेल्ट यांचा मृत्यू दुसरे जागतिक युद्धं संपण्यापूर्वी झाला. दुसर्या महायुद्धानंतर युरोपची फाळणी झाली आणि लोकशाहीवादी युरोप आणि कम्युनिस्ट युरोप असे दोन युरोप निर्माण झाले. कम्युनिझम हे एक मोठ भूत आहे आणि त्याने व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, समाजवाद हा व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात आहे, समाजवादात सर्वशक्तिमान सरकार लोकांचे अधिकार आणि हक्क हिरावून घेते, जर अमेरिकेतील सरकार अशा प्रकारे सर्वशक्तिमान झाले तर स्वातंत्र्याचा लोप होईल त्यामुळे सरकारच्या आकाराला मर्यादित ठेवले पाहिजे अहस प्रकारची विचारसारणी रिपब्लिकन पक्षात जोर धरू लागली. या लोकांचा स्वाभाविकच फ्रॅंकलिन रुझोवेल्ट यांच्या धोरणांना आणि पर्यायाने डेमोक्रॅटिक पार्टीला विरोध होता. अशाप्रकारे अमेरिकन राजकीय पक्षांची निर्मिती थोडक्यात सांगता येईल.
डेमोक्रॅटिक विचारधारा
- सरकारने लोकहितवादी धोरणे राबवली पाहिजेत. असे करताना व्यक्तिस्वातंत्र्याचा थोडा संकोच झाला तरी चालेल.
- लोकहितवाडी धोरणांची उदाहरणे. गरीबांना अन्नासाठी स्टॅम्प देणे, बेरोजगारांना भत्ता, पर्यावरण नियंत्रण, बँकांवर, स्टॉक मार्केट वर नियंत्रण. इत्यादि.
- आर्थिक आणि सामाजिक समता, ही प्रमुख सरकारची मुख्य उद्दिष्टे असली पाहिजेत.
- श्रीमंतांवर अधिक कर लागू करावा.
- स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार असला पाहिजे.
- समलिंगी संबंध हे जनुकीय रचनेशी संबंधित असावे. समलिंगी जोडप्यांना इतर जोडप्यांसारखेच अधिकार असले पाहिजेत.
- प्रश्न युद्धाने सोडवण्यापेक्षा सामोपचाराने सोडवले पाहिजेत.
- ग्लोबल वॉर्मिंग ही खरी गोष्ट आहे आणि त्याला मनुष्याची अतिरेकी जीवनसारणी कारणीभूत आहे.
- धर्म आणि सरकार यांची गल्लत करता कामा नये.
रिपब्लिकन विचारधारा
- सरकारचे स्वरूप मर्यादित असले पाहिजे. प्रत्येक व्यक्ति सरकरविना व नियंत्रणरहित वातावरणात आपला उत्कर्ष स्वत: साधू शकते.
- सरकारने उद्योग धंद्यावर नियमांचा बोजा ठेवू नये कारण त्याने रोजगार्निर्मितीला अडथळा निर्माण होतो.
- सरकारने वायफट खर्चाला आळा घातला पाहिजे. (याचा बर्याच वेळेला अर्थ असा होतो की गरीबांना अन्नासाठी स्टॅम्प देणे हा वायफट खर्च आहे.)
- श्रीमंतांवर कर कमी असावा कारण ते रोजगारनिर्मिती करतात.
- गर्भपात बेकायदा ठरवावा.
- समलिंगी संबंध ठेवणे हे ऐच्छिक असून ते पाप आहे (कारण बायबल तसे सांगते). समलिंगी संबंधांना मान्यता दिली तर प्रचलित लग्न व्यवस्था मोडीत निघेल. लग्न हे एक पुरुष आणि एक स्त्री यांमध्येच असू शकते, दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष यांना लग्नाचा अधिकार नाही.
- अमेरिकेचे जगातील स्थान महत्वाचे असून अमेरिकेला युद्धं करण्यासाठी कोणाचीहि परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
- ग्लोबल वॉर्मिंग हे थोतांड आहे. विशेषत: मानवाची कृत्ये ग्लोबल वॉर्मिंगला करणीभूत आहेत हे थोतांड आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जगातील सर्व प्रश्नांना अमेरिका काशी जबाबदार आहे हे जगाच्या माथी मारण्यासाठी यूरोपियन आणि इतर उदारमतवादी, पुरोगामी लोकांनी रचलेले हे एक कुभांड आहे. यातून अमेरिकेवर, इथल्या उद्योग धंद्यावर नियंत्रणे आणायची आणि अमेरिकेचे जगातील नंबर एकचे स्थान हिरावून घेण्याचे एक कारस्थान आहे.
- अमेरिकन राष्ट्र हे Judeo-Christian philosophy वर आधारित आहे.
Jan 23, 2012 @ 17:34:26
Hi Aniruddha,
Great article. I do have one question though, do republicans have those religious beliefs in their agenda….i was amazed…i thought they were primarily selling capitalism. You also be surprised on hearing the fact that the land which so aggressively sells capitalism, is home to first ever socialism ideas and experiments.
nachiket
Jan 24, 2012 @ 13:36:11
Dear Nachiket, Republicans do. They try to involve and push their religious agenda as far as possible. I did not understand what you meant by “the fact that the land which so aggressively sells capitalism, is home to first ever socialism ideas and experiments”, but I assume you are referring to Social Security or Food Stamp. Social Security system is revolutionary, and we need to understand in the context of Depression and World War 2. At the time of Depression there were no regulations such as FDIC, SEC etc. So people lost their entire life’s money and had nothing left in the future. These circumstances might be hard today to understand but FDR introduced these ideas of Social Security at such time and were very popular and still are.
Jan 27, 2012 @ 15:53:56
Hi Aniruddha,
Yes, I do agree about social security and food stamp. I think these ideas have a good future in Indian contexts as well ( of course our systems and politicians yet to have that foresight). I am referring to Robert Owen who did some fantastic communism experiments and shared idea of communism ( not socialism though) in 1900s. But the experiments failed miserably and Europeans like Marks did use them. Try to find ” Heaven On earth: The Rise and Fall of Socialism” documentary. I will post a link for that if I could find, downloaded it myself. It is just the irony I couldn’t stop thinking about after I saw the doc.
keep blogging. Great articles. I enjoy reading them.
Nachi