आयोवा कोकस ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूक प्रक्रियेतील पहिली निवडणूक. अमेरिकेतील प्रमुख पक्ष म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रट आपला उमेदवार ज्या प्रक्रियेतून ठरवतात त्या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे आयोवा कोकस. सान २०१२ च्या निवडणुकीत डेमोक्रट राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पुन्हा निवडणूक लढवणार असल्यामुळे या वर्षी सर्व धामधूम रिपब्लिकन इच्छुकांची होती. या कोकस चा निर्णय ३ जानेवारीला लागला आणि रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार मिट रोमनी हे फक्त ८ मतांनी विजयी झाले! या विजायला विजय म्हणायचं का? हाही मोठा प्रश्न आहे पण ह्या सर्वांची चर्चा करण्या अगोदर सर्वप्रथम आपण कोकस आणि प्रायमरी म्हणजे काय हे सर्वप्रथम जाणून घेऊ.
कोकस या प्रक्रियेमध्ये राज्यातील त्या त्या पक्षाचे सदस्य गठ्या गठ्याने नियोजित जागी एकत्र येतात. उदा. एखाद्या जिल्ह्यामध्ये (अमेरिकन कौंटी) ज्या ज्या शहरांमध्ये जी नियोजित ठिकाणे असतील तिथे. त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतीनिधी किंवा प्रत्यक्ष उमेदवार एखादे भाषण देतात आणि मग पक्षाचे सदस्य कागदावर आपल्या उमेदवारचे नाव लिहितात. मग ही सर्व मते जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र करून त्या जिल्ह्याने कोणता उमेदवार निवडला हे जाहीर केले जाते. खरेतर या मतमोजणी नंतर जिल्ह्याचे प्रतींनिधी निवडले जातात. आयोवा राज्याला २५ प्रतीनिधी निवडता येतात. हे प्रतीनिधी नंतर प्रत्यक्ष उमेदवार निवडीच्या अधिवेशनात (convention) जातात आणि राज्यातील सदस्यांनी ज्या उमेदवारला निवडले आहे त्या उमेदवारला आपली मते देतात. राज्याच्या प्रतीनिधींनी राज्यातील सभासदांनी ज्या उमेदवारला निवडले आहे त्यालाच मत द्यावे अशी कायदेशीर सक्ती नाही, परंतु प्रतींनिधी कायमच राज्यातील सदस्यांचा मन राखून ज्याला सदस्यांनी निवडले आहे त्यालाच मत देतात.
आता या वर्षी मिट रोमनी आठ मतांनी विजयी झाले असल्यामुळे त्यांना रिपब्लिकन अधिवेशनात आयोवची २५ मते मिळतील. एकंदर पक्षाचा अधिकृत उमेदवार होण्यासाठी २५०० हून अधिक अशा प्रकारची मते मिळवायची असतात. परंतु आयोवा नंतर न्यू हॅमप्षर (New Hampshire) ही राज्ये सर्वात आधी मतदान करीत असल्यामुळे जो विजयी होतो त्याला प्रचाराची गती (momentum) मिळते. त्यामुळे प्रचारासाठी अधिक पैसा, टीव्हीवर अधिक वेळ अशा गोष्टी उपलब्ध होतात. शिवाय या दोन राज्यांमधील प्राथमिक निवडणुकांमध्ये जे जिंकत नाहीत त्यातील जे हवसे नवसे आहेत ते बाहेर पडतात आणि मैदान साफ व्हायला सुरुवात होते.
आता या वर्षीच्या निवडणुकीकडे बघू. या वर्षी रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार मिट रोमनी हे फक्त ८ मतांनी विजयी झाले. दुसर्या स्थानावर अनपेक्षिपणे रिक संटोरम (Santorum) आले. या दोन उमेदवारणमध्ये जामीन आसमानाचा फरक आहे. मीट रोमणी यांनी भजनलाल आणि बनसीलाल यांनी जितक्या वेळा आपले पक्ष बदलले असतील त्यापेक्षा जास्तच पण कमी नाही इतक्यावेळा आपल्या भूमिका बदलल्या आहेत. त्याला करण देखील आहे आणि ते म्हणजे फक्त राजकीय सोय हे होय. मीट रोमनि हे अमेरिकेतील Massachusetts या अतिशय पुरोगामी राज्याचे राजकीय दृष्ट्या उजव्या पक्षाचे governor होते. गवर्नर होण्यापूर्वी त्यांनी त्या राज्यातून सीनेट ची अपयशी निवडणूकही लढवली. ती निवडनुकही त्यांनी जॉन केनेडी (Kennedy) यांच्या भावाविरुद्ध टेड केनडी यांच्याविरुद्ध. साहजिकच त्यावेळेला सोयिस्कर भूमिका म्हणून त्यांनी स्वत:ला पुरोगामी म्हणवले. त्यावेळी त्यांनी असे संगितले की आपण स्त्रियांना गर्भपात करण्याचा कोर्टाने मान्य केलेला अधिकार आपण कायम ठेवू जरि आपला स्वत:चा त्याला विरोधा असला तरी. आता ते म्हणतात की आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर हा कोर्टाचा निर्णय फिरवू. 2008 साली रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जेव्हा त्यांनी असाच प्रयत्न केला तेव्हा त्यांनी देशात बेकायदेशीर परकीय (illegal immigrants) लोक राहत आहेत त्यांना कायदेशीर दर्जा च नव्हे तर नागरिकत्व (not only permanent resident status but also citizenship) देण्याला सशर्त पाठिंबा दिला होता. आता मात्र जेव्हा पक्षाचा बेस त्याला कडाडून विरोध करीत आहे हे लक्षात अलयावर त्यांनी या गोष्टीला विरोध केला. मीट रोमनी जेव्हा Massachusetts चे गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी वैद्यकीय खर्चासाठी सरकारी विमा योजना काढली. त्या योजनेमध्ये असा विमा घेणे हे Massachusetts च्या नागरिकांना बंधनकारक केले. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी अशाच स्वरूपाची योजना देश पातळीवर राबवली. यावेळेला मात्र रिपब्लिकन पक्ष या योजनेला विरोध करीत आहे. अशी योजना म्हणजे सरकार तुमची उपाय योजना ठरवणार, ही योजना म्हणजे socialism आहे अशा स्वरूपाचा अपप्रचार सर्व ओबामा विरोधक करीत आहेत. आणि त्या मध्ये मिट रोमनी देखील सहभागी झाले आहेत. अशाप्रकारे मिट रोमनींनी अनेक कोलन्ट्याउड्या मातल्या आहेत. आणि हीच गोष्ट रिपब्लिकन पक्षाच्या बेसला पटत नाही. याशिवाय एक प्रश्न आहे तो म्हणजे रोमनींच्या धर्माचा. आपल्याला असे वाटते की ख्रिश्चन धर्म एकच हे परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ख्रिशन धर्मामध्ये, रोमन कॅथॉलिक, बापटिस्ट (Baptist) तसेच मोर्मन नावाचाही एक पंथ आहे. मोर्मन हा पंथ तुलनेणी नवा असल्याने आणि या पंथा बाबत अनेक गैरसमज असल्याने अमेरिकेतील अनेक ख्रिश्चन धर्मीय या पंथाला cult असे समजतात. रोमनी हे मोर्मन असल्यामुळे त्यांना कट्टर ख्रिश्चन पंथीयांचा विरोध आहे.
ही झाली रोमनी विरोधाची बाजू. आता सनटोराम (santorum) यांची भूमिका आपण जाणून घेवूयात. साण्टोरम हे अतिशय उजव्या विचारसरणीचे आहेत. अमेरिका हा देश ख्रिश्चन मूल्यांवर उभा राहिला असून अशी मूल्ये सरकारच्या कार्यक्रमात दिसली पाहिजेत. अबोर्शन वर बंदी घातली पाहिजे. गरिबांसाठीच्या योजना कमी केल्या पाहिजेत आशाई त्यांची विचारसारणी आहे. अशा विचारसरणीमुळे मुख्य निवडणुकीत ते विजयी होणार नाहीत म्हणून जनमत चाचण्यांमध्ये ते मागे राहिले. रोमनींनी प्रचंड पैसा खर्च केला आणि साण्टोरम यांच्याकडे पैशाचे पाठबळ नसल्यामौळे त्यांनी अगदी साधा परंतु मेहनती प्रचार केला. सभे मध्ये एक जरी व्यक्ति उपस्थित असेल तरी त्या व्यक्तीशी संवाद साधायचा, कुटुंबाचे महत्व, धर्माचे महत्व पटवून द्यायचे, तळागाळतल्या व्यक्तीशी संवाद साधायचा, आपले आजोबा कसे कष्टकरी खाणकामगार होते, आणि आपणही कसे कष्टकरी कुटुंबातून आलो आहोत याच्या गोष्टी सांगून त्यांनी लोकांची मने आणि मते जिंकली. अजून एक गोष्ट साण्टोरम यांच्या पथ्यावर पडली ती म्हणजे आयोवा मधील मतदार हा अत्यंत उजव्या विचारसरणीचा आहे. उदा. पुण्यामधील सदाशिव आणि नारायण पेठेतला मतदार जसा आहे तसा. या सर्व गोस्थिंमुळे साण्टोरम यांनी अतिशय कडवी लढत मीट रोमनी यांना दिली.
आयोवा निवडणुक जरी अत्यंत अटीतटीची झाली असली तरी न्यू हॅम्पशायर मध्ये मात्र रोमनी यांनी सहजगत्या विजय नोंदवला. त्याला कारण की मीट रोमनी हे जवळच्याच मासेच्युसेत्त्स (Massachusetts) या राज्याचे गव्हर्नर होते, त्यांचे एक घरही न्यू हॅम्पशायर मध्ये आहे. शिवाय न्यू हॅम्पशायर मधील रिपब्लिकन मतदार हा तुलनेणी उदारमतवादी आहे. या मतदारला कोणता उमेदवार ओबामांना निवडणुकीत हरवेल हे जास्त महत्वाचे वाटते.
आयोवा आणि न्यू हॅम्पशायर या प्राथमिक निवणुका जिंकून एमआयटी रोमनी यांनी मोठी मजल मारली हे निश्चित! मात्र ह्या लढाया जिंकून ते युद्ध जिंकतात का नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. एक मात्र निश्चित म्हणता येईल की this campaign is now Romney’s to lose!